(१)
(२)
साहित्य:
१) १ कप बासमती तांदूळ.२) पावणे दोन कप उकळते पाणी.
३) ३/४ कप मटार.
४) ३/४ कप बारीक चिरलेला गाजर
५) १/४ कप बारीक चिरलेली फरसबी(१ इंचाचे तुकडे)
६) १/२ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
७) २ तिखट हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
८) आलं-लसूण पेस्ट -१ टी स्पून
९) २ माध्याम आकाराचे कांदे-पातळ उभे काप करून
१०)१ छोटा टोमेटो बारीक चिरून
११)चिमुटभर हळद
१२)बिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून
१३) खडा गरम मसाला (२ तमालपत्र,२ वेलची,२लवंग)
१४) ३ टिस्पून तूप
१५)४-५काजु(तुकडे करून)
१६) चवीनुसार मीठ
कृती :
१)तांदूळ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत घालावे.५ मिनिटे झाल्या नंतर तांदुळ जाळीत काढून १०ते१५ मिनिटे तसाच ठेवा.२)एका खोलगट नॉनस्टिक पातेल्यात तूप गरम करत ठेवावे,तूप गरम झाले कि त्यात खडा गरम मसाला घालून
५ ते १० सेकंद परतावे. यांत पातळ उभा चिरलेला कांदा घालावा व चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा .नंतर टोमेटो व हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे तसेच काजूचे तुकडेही घालून परतून घ्यावेत.
३)आता यांत आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच सर्व
भाज्या घालाव्यात व ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावे यातच
निथळलेले तांदुळ घालुन १-२ मिनिटे परतावे.तसेच
बिर्याणी/पुलाव मसाला, हळद घालावी व परतून घ्यावे
४) वरील तांदळात उकळते पाणी, मिठ घालावे आणि
ढवळावे, मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यावी सुरुवातीला
झाकण ठेवू नये.
५) काही मिनिटांत भाताच्या पृष्भागावरील पाणी कमी
होईल. पाणी कमी झाले की आच एकदम मंद करावी झाकण ठेऊन ४ मिनिटे वाफ काढावी.
६)४ मिनिटं झाली की झाकण काढून भात तळापासून ढवळा
भाताची शिते मोडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
पुन्हा झाकण ठेऊन १५ मिनिटे वाफ काढावी.आच बंद करावी शेवटी बारीक चिरलेली कोथींबीर घालून गरम पुलाव रायत्या बरोबर किंवा टोमॅटो सूप बरोबर सर्व्ह करावा.
टिपः
१)आवडत असल्यास वरून तळलेला कांदा घालू शकता२)खडा गरम मसाला न घालता पुलाव बनवू शकता
कारण पुलाव खातांना तो अख्खा मसाला अडथळा आणतो पण त्यासाठी बिर्याणी/ पुलाव मसाला जास्त वापरा छानच चव देतो.
३) पुलाव भातात आवडीनुसार भाज्या घालू शकतो.पण
गाजर,मटर, फरसबी असावीच. तसेच एकच भाजी घालुन
सुद्धा पुलाव बनवता येतो.जसे गाजर किंवा फक्त मटर.
४) तुपाचे प्रमाण गरजे नुसार कमी जास्त करावे. तिखट
हिरवी मिरची चे प्रमाण आवडी नुसार कमी जास्त करावे.
५)पुलाव चा रंग पांढरा हवा असेल तर हळद घालु नका तसेच
बिर्याणी /पुलाव मसाला सुध्दा घालु नका त्याऐवजी वरील साहित्यात दिलेले अख्खे मसाले तसेच स्टार फुल,दालचिनी,
हे अख्खे मसाले वापरा.(फोटो क्र.२)
-kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏
(पालक कॉर्न पुलाव रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_6.html


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा