२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य :
१) २-३ उकडलेले बटाटे
२) ५-६ हिरव्या मिरच्या
३) १/२ वाटी शेंगदाणा कूट
४) ४-५ कढीपत्त्याची पाने
५) १/२ छोटा चमचा जीरे
६) कोथिंबीर बारीक चिरून
७) ओल खोबर
८) १ छोटा चमचा साखर
९) तेल फोडणीसाठी
कृती:
प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे,
कढीपत्ता व बारिक चिरलेली हिरवी मिरची
घालावी.
उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून चांगले
परतून घ्यावे. मीठ घालून
परतावे झाकण ठेवून ५ मिनिटे मंद गॅसवर
उसळ होऊ द्यावी साखर, खोबरे व कोथिंबीर घालून खावयास घ्यावी
उसळ होऊ द्यावी साखर, खोबरे व कोथिंबीर घालून खावयास घ्यावी
खोबर आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल
--kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा