साहित्य: २ वाट्या जाडसर रवाळ बेसन (डाळीचं पीठ), पाव ते अर्धी वाटी साजूक तूप, १ ते सव्वा वाटी पिठीसाखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, वर लावण्यासाठी बेदाणे, मनुका, काजु किंवा बदाम काहीही चालेल. (तयार जाड बेसन फार जाड वाटलं तर थोडंसं मिक्सरमधे कोरडंच फिरवून घ्या)
कृती –
१) एका नॉनस्टिक कढईत बेसन भाजायला घाला. आधी तूप न घालता कोरडंच भाजा. मध्यम आच ठेवून सतत हलवत भाजा. बेसन लवकर जळतं म्हणून लक्षपूर्वक भाजा.
२) बेसनाचा खमंग वास यायला लागला आणि रंग लालसर व्हायला लागला की त्यात तूप घाला. सगळं तूप एकदम घालू नका. थोडंथोडं घालून अंदाज घ्या आणि मग हवं तसं घाला.
३) तूप घालून परत मध्यम आचेवर सतत हलवत बेसन आणखी खमंग भाजा. गॅस बंद करा.
४) बेसन कोमट झाल्यावर मग त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड मिसळा. गरम असताना मिसळू नका कारण मग साखर विरघळून मिश्रण पातळ होईल.
५) नंतर त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळा.
इतक्या मिश्रणात मध्यम आकाराचे वीस लाडू होतात.
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏
- kalyani
Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा