मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

अंडा भजी




साहित्य :

१) दोन अंडी.
२) १ वाटी बेसन.
३) तळण्यासाठी तेल.
४) पीठ भिजवण्यासाठी पाणी.
५) चवीनुसार मीठ.
६) खाण्याचा सोडा.

कृती :

१) दोन अंडी उकडून त्याचे प्रत्येकी दोन तुकडे करावे ,एक वाटी बेसन भजींच्या पिठासारखे भिजवावे.
२) त्यात चवीला मीठ व किंचित खाण्याचा सोडा टाकावा. अंड्याचा एक-एक तुकडा पिठात भिजवून ज्या पद्धतीने भजे तळतात त्याप्रमाणे तेलात तळून घ्यावे .
३) असे सर्व तुकडे तळावेत. चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस सोबत खावे.

-kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

व्हेजिटेबल पुलाव.

                                      (१)



                                     (२)
                           

साहित्य:

१) १ कप बासमती तांदूळ.
२) पावणे दोन कप उकळते पाणी.
३) ३/४ कप मटार.
४) ३/४ कप बारीक चिरलेला गाजर
५) १/४ कप बारीक चिरलेली फरसबी(१ इंचाचे तुकडे)
६) १/२ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
७) २ तिखट हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
८) आलं-लसूण पेस्ट -१ टी स्पून
९) २ माध्याम आकाराचे कांदे-पातळ उभे काप करून
१०)१ छोटा टोमेटो बारीक चिरून
११)चिमुटभर हळद
१२)बिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून
१३) खडा गरम मसाला (२ तमालपत्र,२ वेलची,२लवंग)
१४) ३ टिस्पून तूप
१५)४-५काजु(तुकडे करून)
१६) चवीनुसार मीठ


कृती :

१)तांदूळ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत घालावे.५ मिनिटे झाल्या नंतर तांदुळ जाळीत काढून १०ते१५ मिनिटे तसाच ठेवा.

२)एका खोलगट नॉनस्टिक पातेल्यात तूप गरम करत ठेवावे,तूप गरम झाले कि त्यात खडा गरम मसाला घालून
 ५ ते १० सेकंद परतावे. यांत पातळ उभा चिरलेला कांदा घालावा व चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा .नंतर टोमेटो व हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे तसेच काजूचे तुकडेही घालून परतून घ्यावेत.

३)आता यांत आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच सर्व
भाज्या घालाव्यात व ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावे यातच
निथळलेले तांदुळ घालुन १-२ मिनिटे परतावे.तसेच
बिर्याणी/पुलाव मसाला, हळद घालावी व परतून घ्यावे

४) वरील तांदळात उकळते पाणी, मिठ घालावे आणि
ढवळावे, मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यावी सुरुवातीला
झाकण ठेवू नये.

५) काही मिनिटांत भाताच्या पृष्भागावरील पाणी कमी
होईल. पाणी कमी झाले की आच एकदम मंद करावी झाकण ठेऊन ४ मिनिटे वाफ काढावी.

६)४ मिनिटं झाली की झाकण काढून भात तळापासून ढवळा
 भाताची शिते मोडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
पुन्हा झाकण ठेऊन १५ मिनिटे वाफ काढावी.आच बंद करावी शेवटी बारीक चिरलेली कोथींबीर घालून गरम पुलाव रायत्या बरोबर किंवा टोमॅटो सूप बरोबर सर्व्ह करावा.

टिपः

१)आवडत असल्यास वरून तळलेला कांदा घालू शकता
२)खडा गरम मसाला न घालता पुलाव बनवू शकता
कारण पुलाव खातांना तो अख्खा मसाला अडथळा आणतो पण त्यासाठी बिर्याणी/ पुलाव मसाला जास्त वापरा छानच चव देतो.
३) पुलाव भातात आवडीनुसार भाज्या घालू शकतो.पण
गाजर,मटर, फरसबी असावीच. तसेच एकच भाजी घालुन
सुद्धा पुलाव बनवता येतो.जसे गाजर किंवा फक्त मटर.
४) तुपाचे प्रमाण गरजे नुसार कमी जास्त करावे. तिखट
हिरवी मिरची चे प्रमाण आवडी नुसार कमी जास्त करावे.
५)पुलाव चा रंग पांढरा हवा असेल तर हळद घालु नका तसेच
बिर्याणी /पुलाव मसाला सुध्दा घालु नका त्याऐवजी वरील साहित्यात दिलेले अख्खे मसाले तसेच स्टार फुल,दालचिनी,
हे अख्खे मसाले वापरा.(फोटो क्र.२)

-kalyani



Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏


(पालक कॉर्न पुलाव रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_6.html

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

तवा मश्रुम.






साहित्य:

१) २०० ग्रॅम बटन मश्रुम(एका मश्रुम चे २ काप करून)
२) २मोठे कांदे(पेस्ट)
३) २लहान लालबुंद टोमॅटो (प्युरी)
४) १/२ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली)
५) १/२ टिस्पून अद्रक पेस्ट
६)  १ टिस्पून लसुण पेस्ट
७)१/२टीस्पून जिरे
८)१/२ ओवा
९)३ मोठ्या पळया तेल
१०)२ टिस्पून लाल तिखट (मसाला)
११)१/२ टिस्पून हळद
१२)१/२टीस्पून गरम मसाला
१३)१ टिस्पून बटर (लोणी)
१४) चवीनुसार मीठ
१५) लोखंडी तवा(खोलगट)
१६)२ हिरवी मिरची पेस्ट
१७) चिमुटभर हिंग
१८)१/२ कप गरम पाणी.

कृती:

१) लोखंडी तवा गरम करा. तवा गरम झाला की आच कमी
करून तेल टाका तेल थोड गरम झालं की त्यात अनुक्रमे
ओवा, जिरे, हिंग, अदरक पेस्ट, लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट,कांदा पेस्ट, घाला २ मिनिटे व्यवस्थित परतून घ्या

२)वरील फोडणीत टोमॅटो प्युरी घालावी ४ मिनिटे व्यवस्थित परतून घ्या. आता यात तिखट, गरम मसाला, हळद,बटर ,
चवीनुसार मिठ घालून मिक्स करावे त्यावर मश्रुम घालून
मिक्स करावे.वर झाकण ठेऊन मंद आचेवर २ ते ३मिनिटे 
शिजवावे २ते३ मिनिटे झाली की १/२कप गरम पाणी ओतून
पुन्हा झाकण ठेवावे ५ मिनिटे झाली की झाकण काढून पुन्हा ५ मिनटे शिजवावे. भाजी शिजली की कोथिंबीर घालून सजवा.

टिपः

१) टोमॅटो प्युरी करण्यासाठी टोमॅटो भाजून घ्यावे
बिया काढून प्युरी बनवावी.
२) कांदा पेस्ट तेलात घालण्या आधीच टोमॅटो प्युरी घालु नये
वरील दीलेल्या कृती प्रमाणेच अनुक्रमे साहित्य घालावे. क्रम उलट सुलट करू नका.
३)ही भाजी तव्यावर स्वादिष्ट लागते.आणि स्पेशली गावच्या चुलीवर 
४) गॅस वर बनवली तरी चालेल पण माझं वयक्तिक मत आहे चुलीवर स्वयंपाक जास्त स्वादिष्ट होतो . फ्लेवर चेंज वाटतो.
५) लाल तिखट (मसाला) चे प्रमाण कमी जास्त प्रमाणात ठेऊ शकता.(आवडी प्रमाणे).
6) ग्रव्ही पातळ हवी असेल तर पाणी जास्त टाका. आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ ठेवा.

-kalyani



Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

बदाम कुल्फी



साहित्य :

१) ३ कप दुध (होल मिल्क)
२) १/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
३) १/२ ते पाउण कप साखर
४) १/३ कप बदामाचे काप
५) २ टिस्पून कॉर्न फ्लोअर
६) १/२ टिस्पून वेलची पूड
७) चिमूटभर केशर

कृती :

१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.
५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.

-kalyani



Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

मटर पनीर


साहित्य :

१)२५० ग्राम पनीर
२)१ कप हिरवे मटार
३)१ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
४) ४ मध्यम टोमॅटो (बारीक चिरलेला)
५) २ टीस्पून गरम मसाला
६)२ टिस्पून आले लसूण पेस्ट
७)७-८काजू
८)मिठ चवीप्रमाणे
९)२ टेस्पून दही(फेटलेले)
१०) कोथिंबीर(बारीक चिरलेली सजावटी साठी)
११) १ टिस्पून धणेपूड
१२) १/२ टिस्पून जिरेपूड
१३) १/२ टिस्पून आमचुर पावडर
१४) १/२ टिस्पून जिरे
१५) १ हिरवी मिरची
१६) १/४ टिस्पून हळद
१७)१-२ टिस्पून लाल तिखट
१८)३ टेस्पून तेल
१९)२तमलपत्र

कृती :

१) पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.

२) एका भांड्यात २ चमचे  तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करून  घ्या

३). तेला मध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला कि हळद आणि आलेलसूण पेस्ट टाका .थोडावेळ परतून बारीक चिरलेला टोमॅटो यात टाकावा. परतावा

४) वरील परतलेले साहित्य थंड झाले की मिक्सर वर थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.

५) पॅनमध्ये १ -२ चमचे  तेल गरम करा, त्यात गरम मसाला मध्यम आचेवर १०-१५ सेकंद परतून घ्या. जिरे घालावे. आता यामध्ये  मिक्सरवर वाटलेले मिश्रण टाका तमलपत्र व थोडे पाणी पण टाका .

६) धणेजिरे पूड आणि लाल तिखट मिश्रणामध्ये टाका . मध्यम आचेवर हिरवी मिरची आणि  हिरवे मटार घालून पाच मिनीटे उकळी काढावी.

८) सुरुवातीला फ्राई केलेले पनीरचे तुकडे घालावेत .३ मिनिटे शिजू द्या. दही घाला ढवळा गॅस बंद करा

९) सजावटी साठी कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करावे
ही भाजी पोळी (चपाती),भात, भाकरी सोबत सुद्धा चविष्ट लागते.


-kalyani



Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

साबुदाणा वडा.





साहित्य :

१) १ कप भिजवलेले साबुदाने
२) २उकडलेले बटाटे
३) १/२शेंगदाण्याचा कूट (शेंगदाने भाजून भरड कूट)
४) ५-६तिखट हिरव्या मिरच्या(पेस्ट करून)
५) १/२ टीस्पून लिंबाचा रस
६) १/४ कप कोथांबीर(बारीक चिरलेली)
७) चवीनुसार मीठ
८) तळण्यासाठी तेल

चटणीसाठी साहित्य:

१)खवलेले ओले खोबरे -१/२ कप
२) हिरव्या मिरच्या -२ (लहान )
३) दही-३ टेबल स्पून
४) कोथांबीर-१/२ कप

कृती :

१) ४ते ५तास स साबुदाणे भिजवावे ५ तासानंतर पाणी 
निथळून घ्या.

२)उकडलेला बटाटा किसून घ्या व यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व शेंगदाण्याचा
कूट ,तिखट मिरची पेस्ट,लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथांबीर व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करावे

३) तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोलाकार गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा

 ४) मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे
व गरमागरम वडे ओल्या खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

चटणी तयार करण्यसाठी -

चटणीचे सर्व साहित्य घेऊन मिक्सरमधून फिरवून घ्यावे व वड्यांसोबत चटणी सर्व्ह करावी.

टिपः

१) तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर,
साबुदाणा कोरडा झाला की १/२ टीस्पून जिरे घाला.

-kalyani


Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

(उपवासाचे घावन रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_7.html


उपवासाचे घावन.



साहित्य :

१) १ वाटी वरी तांदूळ
२) १ वाटी साबुदाणे
३) २ हिरव्या मिरच्या
४) २ चमचे नारळाचा चव
५) २ चमचे दाण्याचे कूट
६) १ चमचा जिरे
७) चवीपुरते मिठ
८) साजूक तूप

कृती :

१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. झाकण ठेऊन एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू झाकण न ठेवता निट भाजू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.

चटणीसाठी साहित्य:

१)खवलेले ओले खोबरे -१/२ कप
२) हिरव्या मिरच्या -२ (लहान )
३) दही-३ टेबल स्पून
४) कोथांबीर-१/२ कप

चटणी तयार करण्यसाठी :

चटणीचे सर्व साहित्य घेऊन मिक्सरमधून फिरवून घ्यावे व
घावन सोबत चटणी सर्व्ह करावी.

टिपः


१) कधीकधी साबुदाणा जास्त चिकट असला तर झाकण ठेवल्याने घावन चिकट बनते आणि उलथायला त्रास होतो.
म्हणून पहिल्या घवणाला झाकण ठेवून वाफ काढून पहावी.
जर घावन चिकट होत असेल तर झाकण न ठेवता  मध्यम
आचेवर दोन्ही बाजू नीट भाजून घ्याव्या.
२) घवणात चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान लागते.
३) मिरची आवडीनुसार कमी जास्त वापरावी.

-kalyani


Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

पालक कॉर्न पुलाव



 (१)


(२)

                            

   साहित्य:

१)१ वाटी बासमती तांदुळ
२)अर्धी जुडी पालकाची पाने
३)अर्धी वाटी मक्याचे दाणे
४)अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप
५)अर्धी वाटी कोथिंबीर
६)१०-१२ पुदीन्याची पाने
७)१ इंच आलं
८) ७-८ लसूण पाकळ्या
९)५-६ हिरव्या मिरच्या
१०) ३ टे.स्पून तेल
११) चवीप्रमाणे मीठ
१२)१ टिस्पून बटर
१३)अख्खे गरम मसाले-२ तमलपत्र,२ लवंगा,
१ हिरवी वेलची
१४)१ कांदा (कापलेला)


पूर्वतयारी :-

एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची पेस्ट करून घ्या.
पालकाची पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करून घ्या.
मक्याचे दाणे आणि गाजराचे काप वाफवून घ्या.
बासमती तांदुळाचा फडफडीत भात शिजवून तो एका परातीत मोकळा करून घ्यावा.(फडफडीत भात बनवण्यासाठी तांदुळ
१० मिनिटे पाण्यात भिजवून नंतर ५ मिनिटे जाळीत निथळत
ठेवा. चवीनुसार मिठ टाका.२ वाटी गरम पाणी टाकून भात बनवा)

कृती:

१)एका नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून घेणे. तेल चांगले गरम झाले की त्यात अख्खे गरम मसाले, कांदा,आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालणे. चांगले परतून घेणे.

२)यात वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आणि गाजराचे काप घालणे. बटर टाका.१ मिनिटभर परतणे. त्यानंतर यात तयार केलेली पालकाची पेस्ट घालणे. चवीनुसार मीठ टाका, मंद आचेवर झाकण ठेऊन ५ मिनिटे वाफ काढावी.

३)आता या मिश्रणात शिजवलेला भात घालून एकजीव करणे. भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घेणे.पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी
गॅस बंद करून परत एकदा अलगद ढवळा.

४)एका डीश मध्ये काढून, त्यावर कोथिंबीर भुरभुरवून सजवणे आणि गरमागरम पुलावाचा आस्वाद घेणे. :)
गाजर, पालक आणि कॉर्न यांच्या रंगामुळे हा पुलाव एकदम रंगीबेरंगी दिसतो.

टीप:-

१)पालक मूळचा थोडा खारट असल्याने मीठ घालताना काळजी घ्यावी.

२) पालक पेस्ट न करता कापुन घेतला तरी चालेल
पेस्ट केलीत तर चवीत फरक पडत नाही कलर मध्ये फरक दिसतो पेस्ट केलीत तर फोटो क्रमांक (१) प्रमाणे कलर दिसेल

३)भात बनवताना त्यात थोड मिठ घाला.आणि ग्रेव्ही मध्ये पण घाला चवीनुसार घाला जास्त किंवा कमी घालू नका.

४) लिंबू सोबत सर्व्ह करा.

-kalyani


Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

बटाटा भाजी(पूरी भाजी)

साहित्य:

१) ३ पळया तेल(मोठ्या)
२) १/२ टिस्पूनमोहरी
३) १/२टिस्पून जिरे
४) ६लसूण पाकळ्या (ठेचून)
५) १छोटा कांदा(बारीक चिरून)
६) १/२ टिस्पून आल (अद्रक पेस्ट)
 ७) कडीपत्ता ७,८ पाने
८)६-७ हिरव्या मिरच्या(बारीक चिरलेली)
९) चिमुटभर हिंग
१०)१/२ टिस्पून हळद
११)१ टिस्पून उडीद डाळ
१२)३ मध्यम आकाराचे बटाटे(उखडून छोटे काप करून)
१३)१/२ कप मटर 
१४) १/२कप कोथिंबीर (बारीक चिरून)
१५) १/२ टीस्पून लिंबू रस
१६)चवीनुसार मिठ



कृती:

१) जाड बुडच्या कढईत अनुक्रमे ३ पळया तेल(मोठ्या),
१/२ टिस्पूनमोहरी, १/२टिस्पून जिरे, ६लसूण पाकळ्या (ठेचून)
१छोटा कांदा(बारीक चिरून), १/२ टिस्पून आल (अद्रक पेस्ट)
 कडीपत्ता ७-८पाने, ६-७ हिरव्या मिरच्या(बारीक चिरलेली)
 चिमुटभर हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून उडीद डाळ टाकावी ही फोडणी साधारण पाच दहा मिनिटे परता.

२)वरील फोडणीत मध्यम आकाराचे बटाटे(उखडून छोटे काप केलेले),१/२ कप मटर , चवीनुसार मिठ घालावे. कोथिंबीर, लिंबू रस घालून मिक्स करावे.

३)झाकण ठेवून मध्यम आचेवर ५ते७ मिनिटे वाफ काढावी.
गरम गरम भाजी पूरी सोबत सर्व्ह करावी.

टिपः

१) आवडी प्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी,जास्त करा.

२) मटर नाही घातले तरी चालेल.

३) लिंबू रस आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल.

४)उडीद डाळ आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल.



-kalyani


Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

(पुरी रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)

https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post.html


(शिरा रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)

https://ghrchaswad.blogspot.com/2019/12/blog-post_54.html


(पालक कॉर्न पुलाव रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)

https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_6.html

बुधवार, १ जानेवारी, २०२०

पुरी


          १)

         २).     



साहित्य:

१) १कप गव्हाचे पीठ

२) १टीस्पून रवा

३) १टीस्पून बेसन पीठ

४) चवीनुसार मीठ

५) आवश्यकतेनुसार तेल(तळण्यासाठी)

६) सुती कापड (पाण्यात भिजवून घट्ट पिळलेला)


कृती:

१) एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, बेसन
मीठ, व्यवस्थित मिक्स करावे त्यावर एक टीस्पून गरम
तेलाचे मोहन घालावे. पुन्हा मिक्स करावे आणि दोन 
मिनिटे थांबावे

२)दोन मिनिटे झाल्यानंतर वरील पिठात आवश्यकतेनुसार
पाणी घालून पीठ ५ मिनिटे मळून घ्यावे. झाकुन ठेवावे.

३ ) दहा मिनिटे झाल्यावर वरील कणिक पुन्हा ५ मिनिटे 
मळून घ्यावे. या कणकेचे दोन सेमी चे समान गोळे करून,
घ्या साधारण १mm जाडी च्या पुऱ्या लाटाव्यात व 
मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.

४)तेल तापत ठेवावे त्यावेळेत जमतील तितक्या पुऱ्या
लाटाव्यात.आणि त्यावर ओल कापड ठेवावं . म्हणजे पुऱ्या
सुकणार नाहीत.

                  दुसरी पद्धत

५) भाकरी बनविण्यासाठी जितका मोठा पिठाचा गोळा 
घेतला जातो तितका घेऊन किंवा थोडा मोठा घेऊन मोठी
पोळी लाटावी आणि ग्लास च्या साह्याने ठसा घेऊन पूरी कापावी .जमतील तितक्या पुऱ्या लाटाव्यात त्यावर ओल कापड ठेऊन झकाव्यात


टिपः

१) गव्हाचे पीठ न वापरता मैदा वापरला तरी चालेल
पण त्यात बेसन वापरू नये.
२) पुऱ्या जास्त जाड किंवा पातळ न लाटता मध्यम 
लाटाव्यात.
३) कणिक खुप घट्ट कीवा पातळ असू नये मध्यम असावे
४)मैदा वापरला तर रंगामध्ये बदल दिसतो(फोटो नं २)


-kalyani

Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

भटुरे

साहित्य: १)१ वाटी दही २)२ वाटी मैदा ३)चवीपुरते मीठ ४)तळण्यासाठी तेल कृती: १) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ...