तयार मिसळ
साहित्य:१ वाटी मटकी (आदल्या दिवशी सकाळी भिजवा. संध्याकाळी उपसून मोड आणायला ठेवा), २ कांदे बारीक चिरून, २ टोमॅटो बारीक चिरून, १-२ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून रेडीमेड उसळ/मिसळ मसाला, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद
वाटण मसाला
वाटण मसाला: १ टोमॅटो, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, १ टेबलस्पून ओलं खोबरं, १ दालचिनीचा तुकडा, २ लवंगा, ५-६ मिरी दाणे, मूठभर कोथिंबीर, थोडीशी शिजलेली मटकी. हे सगळं साहित्य अगदी बारीक एकजीव वाटून घ्या.
वाटलेला मसाला
कृती:
१) मोड आलेली मटकी लहान कुकरला भरपूर पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून शिजायला लावा. पाण्याला उकळी आल्यावर मग कुकरची शिटी लावा. जेमतेम एक शिटी करून गॅस बंद करा. मटकीचा लगदा होता कामा नये.
२) कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं परता.
३) कांदा चांगला शिजला की मग त्यात टोमॅटो घाला.
४) टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद आणि १ टीस्पून तिखट घाला. चांगलं परतून घ्या.
५) नंतर त्यात वाटलेला मसाला घाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत मधूनमधून हलवत मसाला चांगला होऊ द्या.
६) त्यात शिजवलेली मटकी पाण्यासकट घाला. रस अगदी पातळ असायला हवा.
७) उसळीला उकळी आली की त्यात तिखट, काळा मसाला, मिसळ मसाला घाला. परत थोडंसं मीठ घाला. सगळं नीट हलवून घ्या आणि खळखळून उकळी येऊ द्या.
८) उकळल्यावर गॅस बंद करा. मिसळ तयार आहे.
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!
-kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा