(१)
(२)
साहित्य:
१)१ वाटी बासमती तांदुळ
२)अर्धी जुडी पालकाची पाने३)अर्धी वाटी मक्याचे दाणे
४)अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप
५)अर्धी वाटी कोथिंबीर
६)१०-१२ पुदीन्याची पाने
७)१ इंच आलं
८) ७-८ लसूण पाकळ्या
९)५-६ हिरव्या मिरच्या
१०) ३ टे.स्पून तेल११) चवीप्रमाणे मीठ
१२)१ टिस्पून बटर
१३)अख्खे गरम मसाले-२ तमलपत्र,२ लवंगा,
१ हिरवी वेलची
१४)१ कांदा (कापलेला)
पूर्वतयारी :-
एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची पेस्ट करून घ्या.पालकाची पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करून घ्या.
मक्याचे दाणे आणि गाजराचे काप वाफवून घ्या.
बासमती तांदुळाचा फडफडीत भात शिजवून तो एका परातीत मोकळा करून घ्यावा.(फडफडीत भात बनवण्यासाठी तांदुळ
१० मिनिटे पाण्यात भिजवून नंतर ५ मिनिटे जाळीत निथळत
ठेवा. चवीनुसार मिठ टाका.२ वाटी गरम पाणी टाकून भात बनवा)
कृती:
१)एका नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून घेणे. तेल चांगले गरम झाले की त्यात अख्खे गरम मसाले, कांदा,आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालणे. चांगले परतून घेणे.२)यात वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आणि गाजराचे काप घालणे. बटर टाका.१ मिनिटभर परतणे. त्यानंतर यात तयार केलेली पालकाची पेस्ट घालणे. चवीनुसार मीठ टाका, मंद आचेवर झाकण ठेऊन ५ मिनिटे वाफ काढावी.
३)आता या मिश्रणात शिजवलेला भात घालून एकजीव करणे. भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घेणे.पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी
गॅस बंद करून परत एकदा अलगद ढवळा.
४)एका डीश मध्ये काढून, त्यावर कोथिंबीर भुरभुरवून सजवणे आणि गरमागरम पुलावाचा आस्वाद घेणे. :)
गाजर, पालक आणि कॉर्न यांच्या रंगामुळे हा पुलाव एकदम रंगीबेरंगी दिसतो.
टीप:-
१)पालक मूळचा थोडा खारट असल्याने मीठ घालताना काळजी घ्यावी.
२) पालक पेस्ट न करता कापुन घेतला तरी चालेल
पेस्ट केलीत तर चवीत फरक पडत नाही कलर मध्ये फरक दिसतो पेस्ट केलीत तर फोटो क्रमांक (१) प्रमाणे कलर दिसेल
३)भात बनवताना त्यात थोड मिठ घाला.आणि ग्रेव्ही मध्ये पण घाला चवीनुसार घाला जास्त किंवा कमी घालू नका.
पेस्ट केलीत तर चवीत फरक पडत नाही कलर मध्ये फरक दिसतो पेस्ट केलीत तर फोटो क्रमांक (१) प्रमाणे कलर दिसेल
३)भात बनवताना त्यात थोड मिठ घाला.आणि ग्रेव्ही मध्ये पण घाला चवीनुसार घाला जास्त किंवा कमी घालू नका.
४) लिंबू सोबत सर्व्ह करा.
-kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा