सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

मश्रुम मसाला ग्रेव्ही

साहित्य:

१) १५० ग्राम बटन मश्रुम
२) ३ मध्यम कांदे (भाजून पेस्ट करून)
३) २लालबुंद टोमॅटो (बिया काढून भाजून पेस्ट करून)
४) ६ काजू (दोन्ही डाळिंब्या वेगळ्या करून)
५) १ छोटा चमचा आद्रक (आल)(पेस्ट करून)
६) ५ लसूण पाकळ्या (ठेचुन)
७) ३ मोठ्या पळ्या तेल
८) १ टीस्पून धणेपूड
९) १ टीस्पून जिरेपूड
१०)१/२ टीस्पून हळद
११)१लाल तिखट
१२)१टीस्पून गरम मसाला
१३)१/२ टीस्पून कसुरी मेथी 
१४) कोथिंबीर
१५) कॉर्नफ्लॉवर, तांदुळ पीठ,
मैदा (यापैकी कोणतेही एक २ टीस्पून)
१६ )चवीनुसारमिठ
१७) पाणी आवशक्तेनुसार

कृती:

१) मश्रुम एक खोलगट भांड्यात घेऊन त्यात
मैदा घाला.४टीस्पून पाणी घाला मश्रुम ला व्यवस्थित
चोळून घ्या.व नंतर धुवा.पुसून घ्या.

२)एका मश्रुम चे सुरीच्या साह्याने २ भाग करा.

३)एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात
अनुक्रमे लसूण,आले पेस्ट,हळद,तिखट, काजु,
कांदा २मिनिटे परतावे , टोमॅटो पेस्ट घालावी व
तेलसुटेस्तोवर परतावे नंतर धणेपूड, जिरेपूड,
कसुरी मेथी,गरम मसाला, चवीपुरते मीठ घालावे.

४)वरील ग्रेव्ही मध्ये मश्रुम काप घालून झाकण
ठेऊन,त्यावर पाणी ठेवावे मध्यम आचेवर 
२० ते २५ मिनिटे वाफ काढावी. 
उतरताना कोथिंबीर घालावी.

टिपः

१) टोमॅटो,कांदे,पेस्ट करताना पाणी घालू नका.
२) मश्रुम पीठ न वापरता धुऊन स्वच्छ केले तरी 
चालतील,पण ते ताजे असावेत.
३) पाणी आपोआप सुटते म्हणून
पाणी टाकू नये.
४)ही भाजी मी चूलीवर जाड बुडाच्या लोखंडी कढईत
केली होती.त्यामुळे रंग थोडा काळपट वाटतो.
माझं स्वतःच मत आहे ग्यास वरच्या जेवणा पेक्ष्या
चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद वेगळा असतो.
५) तुम्ही गॅस वर ही भाजी बनऊ शकता.


-kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
Shelarkalyani05@gmail.com


Ghrchaswad.blogspot.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!


साधा शिरा

साहित्य:

१) १ कप रवा
२) १ कप साखर
३) १ कप दूध
४)१ कप पाणी
५)३ वेलची(पूड करून)
६)१/२ टीस्पून जायफळ पूड
७)१० काजु (पातळ काप)
८)४ छोटे चमचे साजूक तूप
९) चवीनुसार मीठ

कृती:

१) जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा.
   मध्यम आचेवर रवा खमंग भाजून घ्या.
२) रवा भाजत असतानाच एकीकडे साखर, दुध,
   पाणी, वेलची पूड, जायफळ पूड, काजु काप मिक्स 
   करून उकळत ठेवा (दुसऱ्या भांड्यात)
३)वरील उकळलेले मिश्रण रव्या मध्ये ओता
   आणि ढवळा गुठळ्या होऊ देऊ नका. पाण्याची पातळी
    थोडी कमी झाली की चवीनुसार मीठ  टाका ढवळा.
४)झाकण ठेवून ५मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी.
    गरमागरम शिरा सर्व्ह करा.

टिपः

१)हा शिरा साधा असल्याने तुम्ही साजुक
तूप न वापरता वनस्पती तूप (डालडा)
वापरला तरी चालेल.
२)काहींना शिर्या मध्ये मीठ आवडत नाही,
 त्यांनी नाही घातले तरी चालेल.
३)रवा व्यवस्थित भाजला नाही तर शिरा चिकट होईल
 म्हणून रवा व्यवस्थित भाजावा.
४) आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण ठेवा.
५) आवडीप्रमाणे सुकामेवा घालावा.


-kalyani


Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!


   

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

प्रसादाचा शिरा

साहित्य:


१) 1/2 कप बारीक रवा

२) 1/4 कप पिकलेल केळ (बारीक काप)

३) 2 कप दूध

४) 1/2कप पाणी

५) 1/2कप साखर

६) अर्धा कप साजूक तूप

७) 1/4 टीस्पून वेलची पूड

८) 1/4 टीस्पून जायफळ पूड

९) 3 टीस्पून बेदाणे

१०) 1/2 टीस्पून केशर.

११) चिमुटभर मीठ.


कृती:


१. जाड बुडाच्या कढईत  साजुक तूप घालून त्यात रवा घलावा सोनेरी रंग यईस्तोवर भाजत रहा.३ ते ४ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.

२. दूध,पाणी, साखर, वेलची पूड, जायफळ पूड , केशर एकत्र करून उकळत ठेवा.

३.रवा थोडासा भाजला की त्यावर केळ्याचे काप टाका. व पुन्हा त्याचप्रकारे भाजत रहा.

४.रव्यात बेदाणे घालावे.

५. उकळते  दूध,पाणी, वेलची पूड, जायफळ पूड , केशर यांचे मिश्रण रव्यात घाला. लगेचच झाकण ठेवा.

६.कमी आचेवर २,३ मिनिटे वाफवून घ्या.

७. मीठ, साखर घालून झाकण ठेऊन ५ मिनिटे पुन्हा वाफ काढावी. साखर विरघळली की गॅस बंद करावा.



टिपः


१.आपल्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करा.
२. आर्ध्या कपाऐवोजी एक कप तुप वापरले तरीही चालेल. तुप जास्त वापरले तर शिरा अजून चविष्ट लागतो.
३.तुम्हाला जर शिऱ्या मध्ये मीठ आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल.
४. आवडी नुसार सुकामेवा घालू शकता.


-kalyani


Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

(उपवसाचा शिरा रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_94.html

भटुरे

साहित्य: १)१ वाटी दही २)२ वाटी मैदा ३)चवीपुरते मीठ ४)तळण्यासाठी तेल कृती: १) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ...