1. २ वाटी बासमती तांदूळ
2. १०० ग्रॅम पनीर
3. १ वाटी मटार
4. १ गाजर
5. ३ कांदे
6. ४-६ पाकळ्या लसूण
7. १ तुकडा आले
8. २ हिरव्या मिरच्या
9. १/२ वाटी अननस चिरलेला
10. १ मोठा चमचा काजू
11. १ मोठा चमचा बेदाणे
12. १ चमचा जीरे
13. ४ लवंग,३ तमालपत्र
14. ३ हिरवी वेलची
15. २ तुकडे दालचिनी
16. ६ आख्खी काळी मिरी
17. मीठ चवीप्रमाणे
18. १/४ चमचा केशर
19. ६ चमचे तूप
2. १०० ग्रॅम पनीर
3. १ वाटी मटार
4. १ गाजर
5. ३ कांदे
6. ४-६ पाकळ्या लसूण
7. १ तुकडा आले
8. २ हिरव्या मिरच्या
9. १/२ वाटी अननस चिरलेला
10. १ मोठा चमचा काजू
11. १ मोठा चमचा बेदाणे
12. १ चमचा जीरे
13. ४ लवंग,३ तमालपत्र
14. ३ हिरवी वेलची
15. २ तुकडे दालचिनी
16. ६ आख्खी काळी मिरी
17. मीठ चवीप्रमाणे
18. १/४ चमचा केशर
19. ६ चमचे तूप
कृती:
तांदूळ धुऊन दहा मिनिटे पाण्यात भिजवा. त्यानंतर तांदूळ पाण्यातून काढून पाच मिनिटे निथळत ठेवा पातेल्यात चार वाट्या पाणी टाकून गॅसवर ठेवा. जी वाटी तांदूळ घेण्यासाठी वापरली होती ,तीच वाटी पाणी घेण्यासाठी वापरा.भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या. मटारचे दाणे काढा. कांदा-लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा. एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या. त्याच कढईत जिर्याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका. आता आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता. पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा-गरम वाढा.टीपा:
१) आपल्या आवडीनुसार आपण पुलाव चा रंग ठेवू शकतो. पिवळा रंग हवा असल्यास हळदीचा वापर करावा.
२) अननसआवडत नसल्यास नाही वापरला तरी चालेल.
३) टोमॅटो आवडत असल्यास अर्धा टोमॅटोचा वापर करावा. आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून झाल्यावर टोमॅटो अर्धा चिरून टाकावा. आपल्या आवडीनुसार भाज्या टाकाव्या जसे की फ्लावर, फरसबी.
४) बासमती तांदूळ न वापरता शाही पुलाव बनवता येतो परंतु तांदूळ जुने.व आकाराने लहान असावेत.
५) तिखट जास्त आवडत असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.
६) वरील फोटोमध्ये शाही पुलाव बनवताना साध्या तांदळाचा वापर केला आहे.
--kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा