▼

रविवार, १० मे, २०२०

उपवासाची बटाटा उसळ





वेळ:  
२० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी.

साहित्य :

१) २-३ उकडलेले बटाटे 
२) ५-६ हिरव्या मिरच्या
३) १/२ वाटी शेंगदाणा कूट 

४) ४-५ कढीपत्त्याची पाने 

५) १/२ छोटा चमचा जीरे  

६) कोथिंबीर बारीक चिरून 

७) ओल खोबर 

८) १ छोटा चमचा साखर  

९) तेल फोडणीसाठी 

१०) मीठ चवीनुसार

कृती:
प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे,
कढीपत्ता व बारिक  चिरलेली हिरवी मिरची 
घालावी.

शेंगदाण्याच कूट घालून ५ मिनिटे परतावे.
उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून चांगले
परतून घ्यावे. मीठ घालून
परतावे झाकण ठेवून ५ मिनिटे मंद गॅसवर
उसळ होऊ द्यावी साखर, खोबरे व कोथिंबीर घालून खावयास घ्यावी 
खोबर आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा